| माणगाव | प्रतिनिधी |
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने सर्वाना जूनी पेन्शन मागणी करीता देशव्यापी बाईक रॅली ता. 09 ऑगस्ट रोजी माणगावात आयोजित केली होती. या बाईक रॅलीला माणगावात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी माणगाव तहसीलदार विकास गारुडकर यांना राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले.
आंदोलन कर्त्यांनी सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पीएफआरडीए कायदा रद्द करा, आठवा वेतन आयोगाचे गठन करा, सर्व विभागातील रिक्त पदे कायम स्वरुपी भरा. कंत्राटी कर्मचार्यांची सेवा नियमीत करा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, कामगार कायदयात केलेल्या सुधारणा तात्काळ मागे घ्या, नविन शैक्षणिक धोरणाचा पुर्नविचार करा, इत्यादी मागण्यांकरीता हि बाईक रॅली काढण्यात आली होती. हे आंदोलन प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा समन्वय समिती जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, महसूल संघटनेचे जितेंद्र टेंबे, जे. एम. मुकणे, तृप्ती पवार, भारती पाटील, बुद्धकोश पवार, बाळा भोनकर, तलाठी संघटना श्री. मोराळे, यांच्या सह अनेक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.