| पनवेल | वार्ताहर |
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजासाठी देण्यात आलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची शासनाने त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी शनिवारी सकल मराठा समाजाच्यावतीने पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी सकल मराठा समाज करंजाडे यांच्या वतीने विनोद साबळे, डॉ.विक्रम पाटील, मारुती महाराज पाटील, योगेश पाटील, चंद्रकांत पाटील, राजू नलावडे आदींनी हे निवेदन पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना दिले. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ग्रामीण भागात व गावागावात जाऊन मराठा समाजासाठी देण्यात आलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली. यावेळी पंचक्रोशीतील आठ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.