मागण्यांच्या पुर्ततेसाठी आदिवासींचे निवेदन

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले.

रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष भगवान नाईक यांची स्वाक्षरी असलेली विविध मागण्याच्या निवेदनात प्रत पालकमंत्री उदय सामंत यांना सुपूर्द केली आहे, या मध्ये मुलभूत सुविधा तातडीने पुरविल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

अलिबाग येथे शासकीय रूग्णालय आहे, परंतू एखादी शस्त्रक्रिया करणे गरजेेचे असल्यास निष्णात सर्जन डाँक्टर उपलब्ध नसल्याने रूग्णाल पनवेल अथवा मुंबई येथे दाखल करावे लागते, तेव्हा जिल्हांत सुसज्ज रूग्णालयाची नितांत आवश्यकता असून ते होणे गरजेचे आहे. ज्या आदिवासी मुलाचे शिक्षण 12 वी पुढे झाले आहे, त्यास नोकरी मिळावी तसेच आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत व्यवसायाकरीता पाच लाख रूपये पर्यंत अर्थसहाय्य मिळावे.

कातकरी बांधवा करीता घरकुल योजना आदिम व शबरी घरकुल योजना वर्षातून किमान चार ते पाच हजार एव्हढी मंजूर करावी, त्या घरकुलाला अर्थसहाय्य तीन लाख रूपयांपर्यत असावी, ही योजना पुर्वी आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत राबविली जात होती, त्याप्रमाणे पुनस्यः ती या कार्यालयामार्फत राबविण्यात यावी व तेथूनच घरकूलाची पहाणी करावी. जिल्हात मोठया प्रमाणात औदयोगिक प्रकल्प येत आहेत, या प्रकल्पात काम करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे, त्यासाठी आदिवासी मुलांकरीता आय.टी.आय. प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आदिवासी समाज भवन होणे गरजेचे आहे, व हे समाज भवन कुरूळ येथे उभारण्यात यावे. आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत. जेणेकरून आदिवासी समाज इतर समाजासह जोडला जाईल व आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणता येईल असे नाईक यांनी म्हटले आहे.

Exit mobile version