ओबीसीतर्फे माणगाव तहसीलदारांना निवेदन

। माणगाव । प्रतिनिधी ।
स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करणेबाबत तसेच मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत व ओबीसीची जात निहाय जनगणना करणे यांसह अनेक मागण्या संदर्भात ओबीसी संघर्ष समन्वय समिती माणगाव तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांना लेखी निवेदन दिले.

यावेळी माणगाव तालुकाध्यक्ष अरुण चाळके, ज्ञानदेव पवार, महादेव बक्कम, उदय कठे, नथुराम करकरे, बापू सोनगिरे, मधुकर नाडकर, राम टेंबे, काका नवगणे, वामन बैकर, सुदाम शिंदे, रामचंद्र सुतार, मंगेश मेस्त्री, अशोक यादव, रविंद्र टेंबे, चंद्रकांत यादव, प्रकाश गोरीवले, दुर्वास म्हसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version