कलोतेफाटा ते नडोदे रस्ता दुरुस्तीसाठी तहसीलदारांना निवेदन

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील कलोतेफाटा ते नडोदे रस्ता खराब झाला असून या रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी यासाठी नडोदे ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

खालापूर तालुक्यातील अनेक भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते, अशी स्थिती बनली असल्याने नागरिकांबरोबर वाहन चालकामध्ये कमालीचा संताप व्यक्त होत असून कलोतेफाटा ते नडोदे या रस्त्यावरून नागरिकांचा प्रवास धोक्याचा बनला असून जीव मुठीत धरून नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कमालीची संतापाची लाट पसरली असून त्यांना हा रस्ता धोक्याची घंटा देत असल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी नडोदे ग्रामस्थांनी नायब तहसीलदार व पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाची 25 फेब्रुवारी भेट घेऊन निवेदन देत लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ सर्व निवडणूकीत बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हणणे नायब तहसीलदार कल्याणी मोहिते यांना ग्रामस्थांनी सांगितले आहे. याप्रसंगी धनजंय विचारे, संतोष पालकर, संतोष दूदुस्कर, अ‍ॅड. अनिकेत विचारे, आशिष दळवी, केदार विचारे, दिलीप विचारे, बाळकू पाटील आदीप्रमुख उपस्थित होते.

Exit mobile version