| तळा | प्रतिनिधी |
तळा नगरपंचायत प्रशासनाकडून भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तळा नगरपंचायत क्षेत्रातील भटके श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करणे व त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याची कार्यवाही करण्यासाठी पेट्स फोर्स पुणे या संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेमार्फत सद्यस्थितीत 45 भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करून त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. हा उपक्रम तळा नगरपंचायतीकडून दोन ते तीन टप्या मध्ये करण्यात येणार आहे. त्याकरीता अर्थसंकल्पामध्ये तशी तरतुद करण्यात आलेली आहे. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात येण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आल्याने नागरीकांना भटक्या श्वानांमुळे होणारा त्रास कमी होणार आहे.






