गव्हाण फाटा येथे बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

| पनवेल | प्रतिनिधी |

बनावट व भेसळयुक्त विदेशी मद्याचा साठा तसेच विनापरवाना देशी दारूची विक्री होत असल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल पथकाने गव्हाण फाटा येथील ओम साई धाब्यावर छापा टाकून एका आरोपीला अटक केली. या कारवाईत मद्यासह स्कुटी आणि दोन मोबाईल असा एकूण दोन लाख 41 हजार 170 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पनवेल-उरण महामार्गावरील गव्हाण फाटा येथील ओम साई धाब्यावर उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला. धाब्याच्या परिसराची तपासणी केली असता तेथे बनावट व भेसळयुक्त विदेशी मद्याचा तसेच विनापरवाना देशी दारूचा साठा आढळून आला. या मद्यसाठ्याची किंमत एक लाख 26 हजार 170 रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय दारूबंदी गुन्ह्यात वापरलेली स्कुटी आणि दोन मोबाईलही जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. डी. फणसेकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक यो. शी. लोळे, कृ. नी. देवरे, वाय. व्ही. पाडळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. ए. मोरे, महिला जवान हर्षदा घरत आणि जे. जी. पाटील यांनी केली.

Exit mobile version