दिघी सागरी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
डीवायएसपी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब तसेच त्यांच्या पोलीस पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चोरीस गेलेले मोबाईल फोन शोधून काढण्यास यश मिळाले आहे.
पोलीस पथकाने तांत्रिक तपासासोबत विविध ठिकाणी केलेल्या चौकशीच्या आधारे अल्पावधीतच चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत केले. संबंधित मोबाईलधारकांना त्यांच्या मोबाईलची परतफेड करून मोठा दिलासा मिळवून दिला. यावेळी भरोडखोलचे माजी सरपंच हरी ओम चोगले व मोबाईलधारक उपस्थित होते. या तत्पर आणि प्रभावी कामगिरीमुळे दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेबाबत पोलीस यंत्रणा सज्ज व कटीबद्ध असल्याचे या कृतीतून पुन्हा एकदा दिसून आले.






