| पनवेल | प्रतिनिधी |
तक्का वरून पनवेलकडे येणाऱ्या रस्त्यावर सध्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर एका बिल्डरकडून भरावासाठी लागणारी माती आणि दगड मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना रिक्षा, दुचाकी तसेच मोठ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, पादचाऱ्यांना देखील जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत आहे. तसेच, या रस्त्यावर धूळ उडत असल्याने परिसरातील नागरिकांनाही त्रास होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.







