| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू या गावी अखिल भारतीय मानवाधिकार आयोगासह कार्यालय उघडण्यात आले आहे. अखिल भारतीय मानवाधिकार आयोगाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बिनिता बर्फ यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शेलू गावात अखिल भारतीय मानवाधिकाराच्या माध्यमातून सामाजिक कामे करण्यात सुसूत्रता यावी, यासाठी हे कार्यालय उघडण्यात आला आहे. या प्रसंगी संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्ष विनिता बर्फे तसेच नवी मुंबई अध्यक्ष डॅनी डिसूजा, कर्जत बचत गटाच्या समूह संसाधन व्यक्ती रेखा हिरेमठ, जिल्हा अध्यक्ष सुनिता कदम आदी उपस्थित होते.





