| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषदचे मॉंसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सुलेखन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी शब्द आणि अंक लेखनाचे गाडे अभ्यासक मनोहर जामकर यांनी विद्यार्थ्यांकडून सोळाखडीचे प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष लेखन करून घेतले. या शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तसेच, मनोहर जामकर यांनी मराठी भाषेचा इतिहास समजावून दिला आणि मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग नक्की मिळेलच, ही अपेक्षा देखील व्यक्त केली. यावेळी ॲड. पल्लवी जगदाळे, ॲड. निरंतर सावंत, दिपक वायदांडे, चेतन सोदारी, अलंकार म्हात्रे, नाझीया शेख, नंदन पानसरे, हर्षवर्धन पवार, कल्पेश देवरे, डॉ. प्रतिक टोगे, रश्मी म्हात्रे, जय दाभोळकर, सारा पवार, जय वत्सराज व साहिल सैनी आदी उपस्थित होते.







