| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील जंगलांना लागणार्या वणव्यांमुळे वनसंपदेचे नुकसान होत असल्याबाबत आ.जयंत पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त करीत तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. रायगड जिल्ह्यात वनहद्दीत उन्हाळ्यात वणवा लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. वणव्याच्या आगीत वनौषधी, विविध फळझाडे, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी घरट्यांसह जळून खाक होतात, तसेच त्याभागात असलेल्या आदिवासी वाड्या व वस्त्यांमध्ये असलेल्या झोपड्यांचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. वनसंपदेचे संवर्धन करण्याकरीता तसेच वन्यजीवांना धोका पोहोचू नये याकरीता वनहद्दीवर जाळरेषा काढण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे, या वणव्यांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने वनहद्दीत वणवा पेटू नये तसेच आग लागल्यास वणवा विझविण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे.याची माहिती दिली (5) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ? आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लेखी उत्तर दिले असून, ठाणे वनवृत्तामध्ये रायगड जिल्हयात अलिबाग व रोहा अशा दोन वनविभागाचा समावेश होतो. या वनविभागात माहे फेब्रुवारी 2021 ते मै-2021 च्या उन्हाळ्यात आगीच्या एकूण 299 घटना घडल्या असून त्यामध्ये 785.44 हे जळीत क्षेत्र झाले आहे.असे स्पष्ट केले.
वणव्याच्या आगीचे स्वरूप है ग्राउंड फायर स्वरूपाचे असतात. यामध्ये गवत, पालापाचोळा छोटे झुडपी इ.ची हानी होते. तथापि, वनवणव्याच्या आगीत तृणभक्षी प्राणी जळून खाक झाल्याचे व आदिवासी वाड्या व रस्त्यांमध्ये असलेल्या झोपड्यांचे नुकसान झालेबाबत ठाणे वनवृत्त विभागात निदर्शनास आलेले नाही. वणव्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी 12 मी. 6 मौ. 3 मी. अशा विविध प्रकारच्या प्रतिबंधक जाळरेषा मुख्यतः वनखंड सीमेवर, वनक्षेत्र रस्त्याच्या दुतर्फा व आंतरराज्य सीमा व परिक्षेत्र सीमेवर घेण्यात येतात. तसेच फायरवॉच टॉवर उभारण्यात आलेले आहेत.
वन वणवा निर्देशनास येताच तात्काळ भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये वनगुन्हा नोंदवून प्रकरणी चौकशी करण्यात येते. वनवणवे लागू याकरीता पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात
जंगलामध्ये आगी लागू नये म्हणून जाळरेषा घेण्यात येते. तसेच फायर वॉचर यांची नियुक्ती करण्यात येते. विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असतो. वन कर्मचारी व स्थानिक लोकांच्या सहभागाने आग विझवली जाते.
आग विझविण्यासाठी फायर ब्लोअर चा वापर करण्यात येतो. वनास लागून असलेल्या गावातील संयुक्त वनव्यवस्था स्थापन समितीचा वनवणवा नियंत्रणात आणण्यासाठी सक्रीय सहभाग असतो. आकस्मितरित्या वणवा लागलेचा संदेश नियंत्रण कक्षास प्राप्त होताच संबंधित वनकर्मचारी यांना कळवून वनवणवा तात्काळ विझवण्याची कारवाई करण्यात येते.अशी माहिती देण्यात आलेली आहे.