माथेरानला येणार्‍या पर्यटकांची दिशाभूल थांबवा; स्थानिक प्रशासनाकडून कार्यवाहीची अपेक्षा

। माथेरान । वार्ताहर ।
प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ अशी बिरुदावली असलेले माथेरान शहरात दिवसेंदिवस दिशाभूल वाढत असून स्थानिक प्रशासनाकडून अजूनही कोणतीही कारवाई होत नसल्याबाबतची खंत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची दिशाभूल वाढली आहे. काही घोडेवाले,हॉटेल व लॉजिंग दलाल,कुली,हे वाहन येत नाही तोच घाटातून गाडीमागे पळतात.परिणामी लूट करण्यासाठी हे धावतात का या विचाराने पर्यटक घाबरतात.गाडीतुन उतरताच तोच गाडीला गराडा घालून वाहनतळातच जाहिरात करायला सुरुवात करतात.पर्यटकाने नकार देताच त्यांना चुकीचा रस्ता दाखवतात.या त्रासाला कंटाळून पर्यटक पुन्हा माथेरान नको रे बाबा असे म्हणतात.
मात्र याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.माथेरान बाहेरील काही लोक माथेरानला विनाकारण बदनाम करताना दिसतात हे माथेरानच्या पर्यटनाच्या दृष्टीने घातक आहे असेही स्थानिक म्हणतात. नगरपालिका व पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.पोलीस दररोज दस्तुरी येथे गस्तीसाठी असतात पण तिथे फक्त पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जाते.त्यामुळे दस्तुरी येथे कायदा व सुव्यवस्था राहिली नाही त्यामुळे माथेरानचे पर्यटन वाचविण्यासाठी माथेरान पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करण्याची गरज असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.याबाबत पोलीस प्रशासनाला विचारणा केली असता आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही अवश्य कारवाई करणार असे सांगण्यात आले.तर पालिका प्रशासन प्रमुख याना फोन लागला नाही.

प्रीपेड सेवा कोमात
घोडेवाले आणि कुली यांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून प्रीपेड सेवा केंद्र उभे केले आहे.या केंद्रामध्ये नंबर प्रमाणे घोडे व कुली उपलब्ध असणार आहे.इथली दिशाभूल रोखण्यासाठी पोलीस ठाणे येथे सभा झाली होती त्यामध्ये प्रीपेड सेवा केंद्र झाल्यानंतर नगरपालिकेकडून सांगण्यात आले होते की प्रीपेड सेवेमुळे फसवणूक थांबेल दिशाभूल होणार नाही.यासाठी केंद्र उभे केले.मात्र आजतागायत हे प्रीपेड केंद्र पर्यटनासाठी खुले केले नसल्याने नगरपालिकेवर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

माथेरान बाहेरील काही लोकांनी माथेरानला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत हे माथेरानच्या पर्यटनाला घातक आहे.नगरपालिका आणि पोलीस प्रशासन एकमेकांवर जबाबदारी न ढकलता त्यांच्या कडून संयुक्त कारवाई अपेक्षित आहे.

दिनेश सुतार,स्थानिक
Exit mobile version