‘विकसित भारत’चे मेसेज थांबवा

निवडणूक आयोगाचे मोदी सरकारला निर्देश

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला व्हॉट्सपवर ‘विकसित भारत’ मेसेज पाठवणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला व्हॉट्सपवर विकसित भारत मेसेज पाठवणे त्वरित थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाकडून अनुपालन अहवाल तात्काळ मागवला होता. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊनही आणि आचारसंहिता लागू होऊनही नागरिकांच्या फोनवर असे संदेश पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाला मिळाल्या होत्या. यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रतिसाद देत निवडणूक आयोगाला कळवले आहे की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पत्रे पाठवली गेली असली तरी त्यातील काही नेटवर्क मर्यादांमुळे प्राप्तकर्त्यांना विलंबाने मिळाली असावीत. देशात 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे.

Exit mobile version