नितेश राणेंना रत्नागिरीत जाण्यापासून रोखले

| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्र पोहचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केल्याचं पहायला मिळालं. या वक्तव्यानंतर मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.भाजपा आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी रत्नागिरीच्या सीमेवरच रोखलं आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला व्हिडीओ ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी पोलिसांकडे कोणताही लेखी आदेश नसल्याची तक्रार केली असून राज्य सरकारवर निशाणा साधला. मला मारण्याची भाषा पोलिसांकडून केली जात असल्याचा आरोपही यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.

Exit mobile version