भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मिडल ईस्टमध्ये वाढत असलेल्या तणावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आशियाई विकास बँकेने (एडीबी) व्यक्त केली आहे. इराण-अमेरिका संघर्ष आणि आखाती भागातील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर होऊ शकतो.

एडीबीचे मुख्य अर्थतज्ज्ञ अल्बर्ट पार्क यांच्या मते, संघर्ष लांबल्यास जागतिक तेल पुरवठा साखळीवर दबाव वाढेल. 2026 मध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 96 डॉलरपर्यंत जाऊ शकते, तर 2027 मध्येही ती 80 डॉलरच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. यामुळे भारतातील महागाई वाढण्याची शक्यता असून, एडीबीने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या वाढीचा अंदाज 6.9 टक्क्यांवरून 6.3 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

तसेच महागाईचा अंदाज 4.5 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.तेल आणि गॅस महागल्यास पेट्रोल-डिझेल, वाहतूक, खतं आणि अन्नधान्याचे दर वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खर्चावरही परिणाम होऊ शकतो. दरम्यान, यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आणि संसाधनांची बचत करण्याचे आवाहन केल्याने आर्थिक परिस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version