। मुंबई । वृत्तसंस्था ।
रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम कच्चा तेलाच्या किमतींवर होत आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरेल ९५ ते १२५ अमेरिकन डॉलर होण्याची शक्यता आहे. यामुळे इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल १५ ते २२ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सद्यस्थितीत, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करतो. इंधन दरवाढीमुळे महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा उत्पादक देश आहे. रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक पुरवठा कमी होईल अशी भीती आहे.