| पनवेल | वार्ताहर |
पनवेल जवळील मुंबई-पुणे महामार्गावरील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरवरील चालक सुनील जाधव (36) रा.चाकण यांचा कंटेनर नादुरुस्त झाला होता. त्या ठिकाणी मेकॅनिकअखिलेश सरोज (38) रा.विक्रोळी मुंबई व राजेंद्र कुमार (28) रा.भिवंडी हे काम करीत होते. मेकॅनिक घेऊन आलेले चालक हर्ष पांडे (27) रा.भिवंडी यांनी त्यांची व्हॅगनर कार कंटेनरच्या पुढे उभी केली होती. त्याचवेळी पाठीमागून येणारा ट्रक यावरील चालक योगेश घोडके (32) रा. जळकोड हे विजयवाडाहून एमपीएमसी मार्केट येथे जात असताना. मुंबई लेन या ठिकाणी आले असता, ट्रक चालकास समोर तिसर्या लेनला उभा असलेला कंटेनर दिसून न आल्याने समोरील उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडकून पहिल्या लेनच्या रोलिंगमध्ये जाऊन अडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून येत असलेला पिअकप टेम्पो चालक जितेंद्र अच्छेचे लाल कुमार (24) रा.कांदिवली, याला पिअकप टेम्पो कंट्रेल न झाल्याने समोरील ट्रकला मागून धडक मारून भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे काम करणारे मेकॅनिक यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर आरआयबी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.