सांगोलानजिक विचित्र अपघात

| सांगोला | प्रतिनिधी |

सांगोलानजिक तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात एका महिलेसह चौघे जखमी झााले. पेंड घेऊ जाणार्‍या आयशरला पिकअप आडवे येऊन दोन्ही वाहनांची धडक झाली यामध्ये या दोन्ही वाहनांनी रोड लगत असणार्‍या नाष्टा सेंटरसमोर उभ्या असलेल्या मोटारसायकलीस धडक दिली. शिवाय नाष्टा सेंटरच्या टपरीही पाडून टाकली.

हा अपघात बामणी ता. सांगोला येथे झाला. याप्रकरणी आयशर चालक किरण रमेश टिंगरे (रा.वाढेगाव नाका, सांगोला) यांनी अज्ञात पिकअप चालकाविरोधात पोलीसात फिर्याद दिली आहे. उषा बापू जाधव व बापू राजाराम जाधव दोघे रा.बामणी ता. सांगोला, महादेव मनोहर उबाळे , राहुल शांताराम रणदिवे दोघे रा. मांजरी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पिकअप मोटारसयाकलसह टपरीवर आदळल्याने टपरीची मोडतोड होऊन सुमारे 30 हजार रुपयांचे, आयशरचे सुमारे 1 लाखाचे तर नाष्टा सेंटरचे सुमारे 30 हजार रुपयांचे असे एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

Exit mobile version