कर्जत तालुक्यात मराठा संघटना मजबूत करा; प्रा. तनपुरे यांचे आवाहन

| कर्जत | प्रतिनिधी |

मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात मराठा समाज असून या समाजाला संघटित करण्यासाठी संवाद दौर्‍याच्या माध्यमातून बैठकांचे सत्र सुरू केले आहे. कर्जत तालुक्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने गर्दी करीत संवाद दौर्‍याला आणि संघटन बांधणी साठी पुढाकार घेतला. दरम्यान, कर्जत तालुक्यातील सर्व समाजाला एकत्र करून एक मोठी आणि बळकट संघटना उभे करूया असे आवाहन मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे यांनी केले.

मराठा सेवा संघाच्या संवाद दौर्‍या निमित्ताने कर्जत येथील रॉयल गार्डन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन मोकाशी, प्रकाश चांदिवडे, बाळकृष्ण परब, वसंत कोळंबे, अनिल भोसले, मधुकर घारे शंकर थोरवे, अ‍ॅड पूजा सुर्वे आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष अनिल भोसले, कार्याध्यक्ष मधुकर घारे, विलास सांगळे, प्रकाश पालकर, ज्ञानेश्‍वर भालिवडे, नारखेडे, सोमनाथ पालकर, नितीन दगडे, जगदीश ठाकरे, राजेश लाड, भगवान पाटील, प्रमोद घरत, सुवर्णा सुर्वे, बंडू तूरडे, अनिल घरत, अतुल कडू, सुभाष पालकर, आकाश कांबळे, राजू पवार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार खट्याळ यांनी केले तर आभार रामदास घरत यांनी मानले.

बैठकीत मराठा सेवा संघाच्या संघटन बांधणी बाबत विचार विनिमय करण्यात आले. प्रामुख्याने राज्य कार्यकारिणी पुर्नगठित करणे, जिल्हा कार्यकारिणी पुर्नगठित करणे तसेच अजिवन सदस्य यांची संख्या वाढवणे, जिजाऊ सृष्टी प्रकल्प उभारण्यासाठी अधिकचा आर्थिक निधी संकलित करणे, तर मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी साठी हॉस्टेल असावे या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी संवाद दौर्‍याच्या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे यांनी समाज बांधवांनी एकत्र येण्यासाठी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवावेत असे आवाहन यावेळी केले. त्याचवेळी सर्वांना मराठा सेवा संघात समाविष्ट करून संघटना आणखी बळकट करावी, असे आवाहन करतानाच सर्व थरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येवून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि समस्या मार्गी लावण्यासाठी आघाडीवर राहून संघटनचे काम करावे. असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच या बैठकीत मराठा सेवा संघ कर्जत तालुकाध्यक्ष अनिल भोसले यांनी भविष्यात मराठा सेवा संघाचे कार्य जोमाने वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version