आयपीएलच्या बैठकीत जोरदार वाद

संघ मालकांमध्ये पडले दोन गट

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल संघ मालकांसोबत बीसीसीआय अधिकार्‍यांची बैठक बुधवारी 31 जुलै रोजी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यलयात पार पडली. या बैठकीत कोलकाताचे मालक शाहरुख खान आणि पंजाबचे मालक नेस वाडिया यांच्यात जोरदार वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

बीसीसीआय आणि संघ मालकांमधील बैठकीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयपीएल 2025 मेगा लिलाव आणि संघात किती खेळाडू ठेवता येईल, हा होता. या बैठकीत आयपीएलच्या लिलावावरुन संघ मालक यांची वेगवेगळी मते समोर आली. शाहरुख खान आणि काव्या मारन यांनी थेट मेगा लिलावाला विरोध केला आहे. एकीकडे शाहरुख खान अधिक खेळाडूंना कायम ठेवण्याच्या बाजूने असल्याचे दिसून आले. परंतु, नेस वाडिया यांना संघांना अधिक खेळाडू ठेवण्याच्या बाजून नव्हते. याच मुद्द्यावरुन शाहरुख खान आणि नेस वाडिया यांच्यात खटके उडाल्याची माहिती मिळत आहे. केकेआर आणि हैदराबाद हे 2024 चे अनुक्रमे विजेते आणि उपविजेते संघ होते. परंतु, आतापर्यंत बीसीसीआयने या संघ मालकांच्या मतावर कोणताही औपचारिक निर्णय दिलेला नाही.

काव्या मारनने मांडलेले मुद्दे
काव्या मारनने बैठीक काही महत्वाचे मुद्दे मांडले. यामध्ये दर 5 वर्षांनी खेळाडूंचा लिलाव व्हायला हवा, हा मुख्य मुद्दा होता. तसेच, संघातील 7 खेळाडूंना कायम ठेवता यावे, अशी मोठी मागणीदेखील काव्य मारनने केली. काव्या मारनने विदेशी खेळाडूंच्या संख्येवरील निर्बंध हटवण्याची मागणी केली कारण बीसीसीआयने गेल्या वेळी कमीत-कमी 2 परदेशी खेळाडूंनाच संघात कायम ठेवण्याची परवानगी दिली होती.
बैठकीला कोण-कोण उपस्थित
या बैठकीत दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार आणि पार्थ जिंदाल, लखनऊ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, सनरायझर्स हैदराबादची काव्या मारन, चेन्नई सुपर किंग्जचे रूपा गुरुनाथ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रथमेश मिश्रा आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले हेदेखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त, अनेक संघ मालक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.
Exit mobile version