शेकापमध्ये जोरदार इनकमिंग

अडुळसे व शरदवाडी ग्रामस्थांचा जाहीर प्रवेश
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
सुधागड तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या विचार करता अडुळसे ग्रामपंचायतीमधील सरपंचपदाच्या उमेदवार यमुना यशवंत वारगुडे आणि अडुळसे गाव व शरदवाडी हद्दीतील असंख्य कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी शेकाप नेते सुरेश खैरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेशाच्या वेळी अडुळसे गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक दगडू अण्णा कदम, सचिन भोईर तसेच शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सरपंचपदाचा उमेदवार आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या प्रवेशामुळे अडुळसे ग्रामपंचायतीवर शेकापचा लालबावटा फडकणार, असा विश्‍वास यावेळी सुरेश खैरे यांनी व्यक्त केला. शेकापक्षाने आजपर्यंत केलेली विकासकामे यांचा विचार करून मी शेकापक्षात प्रवेश केला असल्याचे सरपंचपदाच्या उमेदवार यमुना यशवंत वारगुडे यांनी ठासून सांगितले.

Exit mobile version