जेएनपीटी | वार्ताहर |
सिडको लॉजिस्टीक पार्कला शेतकर्यांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे. अशा शेतकर्यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभी राहणार, असा विश्वास भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर यांनी सिडकोबाधित शेतकर्यांना दिला आहे.
प्रकाश ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले, की उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी देशाच्या उन्नतीसाठी आपल्या शेतजमिनी अल्प किंमतीत संपादित करुन दिल्या. परंतु, आजतागायत सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. धुतूम, जासई, वेश्वी, चिर्ले, दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या घरांना नोटीसी बजावत सिडको लॉजिस्टीक पार्कच्या नावाखाली घरादारावर नांगर फिरवण्याचा घाट घालत असतील, तर भाजप ते कदापि सहन करणार नाही. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रकाश ठाकूर यांनी सिडकोला दिला आहे.