। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
दहावीच्या परीक्षेमध्ये कमी टक्केवारी पडल्याच्या कारणावरून 17 वर्षीय रोनक विपुल बाथम याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलमध्ये घडली. या घटनेची नोंद 15 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय रोनक विपुल बाथम हा हनुमान कृपा, पनवेल येथे राहत असून त्याला दहावीच्या परीक्षेमध्ये 55 टक्के गुण मिळाले. टक्केवारी कमी पडल्याच्या कारणावरून त्याने 15 एप्रिल रोजी घराच्या बेडरूममधील सिलिंग फॅनला चादरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गांधी हॉस्पिटल, पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.






