‘स्टेपिंग स्टोन’ स्कूलमध्ये विद्यार्थी दिन उत्साहात

। सावंतवाडी । प्रतिनिधी ।

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिन व जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहावीची विद्यार्थिनी सायना अळवणी हिने केले. सहावीतील हेरंब नाटेकर याने त्याच्या वाचनातून डॉ. अब्दुल कलाम यांचा जीवनपट सर्वांसमोर उभा केला. त्यांचे अनेक पैलू, कामाची जिद्द व विविध संस्थांमध्ये त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी दिलेले मोलाचे योगदान याबद्दल माहिती दिली. वाचाल तर वाचाल, या संकल्पनेचा अर्थ पटवून दिला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली.

आजच्या आधुनिक पिढीला साहित्याची गोडी लागावी, म्हणून वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आणि शब्द संपत्तीमध्येही वाढ होते. वाचन आपल्याला जगण्याचे मोल शिकविते, असे मार्गदर्शन केले. शालेय ग्रंथपाल मीनाक्षी राजावत यांनी पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय ग्रंथालयातील विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी दिली.

Exit mobile version