| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात विविध विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. त्यात कर्जत येथील युनिव्हर्सल ए.आय. युनिव्हर्सिटीतील द्वितीय वर्षातील विद्यार्थी अवधूत वारगे हा प्रमुख आकर्षण ठरला आहे. त्याने अंतिम 20 मध्ये यश मिळवले असून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नवी दिल्ली येथे ‘कलाम व्हिजन नॅशनल स्टेड ॲंड क्विझ कॉनक्लेव्ह 2025′ या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात देशातील विविध राज्यातील 220 हून अधीक शाळा व महाविद्यालयांतील सुमारे 415 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही ऑनलाईन सहभाग दिसून आला. या अधिवेशनामध्ये विद्यार्थ्यांनी, नॅनोटेक्नॉलॉजी, रीयूजेबल एरोस्पेस व्हेइकल्स, भविष्यातील ऊर्जा, रिमोट सेन्सिंग, आपत्ती व्यवस्थापन आणि संचार नेटवर्क्स या विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. आदित्य एल 1 चे संचालक डॉ. निगार शाजी, चांद्रयानच 3चे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. पी. वीरमुथुवेल यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच, जिल्हा परिषद राज्य आदर्श शिक्षक डॉ. संदीप वारगे यांचा सुद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गुरुग्रामचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. अग्रवाल तसेच केंद्र व राज्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.





