। पनवेल । प्रतिनिधी ।
पेट्रोल भरण्यास स्कूटी ढकलत घेऊन जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, एक तरुणी जखमी झाली आहे. साक्षी अरुण पाटील (15) रा. पाटनोली असे मृत तरुणीचे नाव आहे, तर कृतिका दिनकर भगत (15) ही जखमी झाली आहे. या अपघाताप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. साक्षी पाटील ही पेट्रोल भरण्यासाठी ऍक्टिवा स्कुटी ढकलत घेऊन जात होती. दरम्यान, जेएनपीएवरून पळस्पेकडे येणाऱ्या सेवा रस्त्यावर पंकज पार्किंगच्या जवळ पुलाच्या खाली त्या आल्या. पुढे कुंडेवहाळ येथे अज्ञात वाहनाने साक्षी पाटील आणि तिच्यासोबत असलेली मैत्रीण कृतिका भगत यांना धडक दिली. या धडकेत साक्षीचा मृत्यू झाला.







