बेलोशी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वार्षिक स्नेहसंमलेन सोहळा उत्साहात साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील लोकनेते ॲड. दत्ता पाटील हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने बुधवारी शाळेतील गुणवंत, खेळाडू व कलावंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

शाळेचे चेअरमन प्रकाश खडपे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य महेंद्र विद्रे, ॲड. राकेश पाटील, माजी चेअरमन राम पाटील, शिक्षण तज्ञ हरिश्चंद्र भोपी, अंजली घोसाळकर, मुख्याध्यापक संंतोष बोंद्रे, सुशील पाटील, पालक प्रतिनिधी आनंद पारंगे, मंजिरी नाकटे, सुषमा तेलगे, स्नेहल वारगे, राजेंद्र चवरकर, विद्यार्थी प्रतिनिधी प्रांजली पाटील, आर्यन भगत, शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

हायस्कूलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून स्वच्छता मोहिमेबरोबरच क्रीडा स्पर्धा, विविध कलागुण सादरीकरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. या कार्यक्रमानंतर बुधवारी गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंंग भरारी घेणाऱ्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला.

Exit mobile version