नांदगाव विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे विद्यार्थी व विद्यार्थीनी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये विद्यार्थिनी प्रतिनिधी सात तर विद्यार्थी प्रतिनिधी तीन असे उमेदवार निवडणूकीसाठी उभे होते. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हा या निवडणूकित कुमार मिहीर सायगावकर हा विद्यार्थी प्रतिनिधी दप्तर या चिन्हावर तर विद्यार्थिनी प्रतिनिधी अनुष्का शिंदे ही छत्री या चिन्हावर बहुमताने निवडून आले. या दोन्ही विजयी उमेदवाराचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश खैरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगदीश सुतार, महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी ढोपे आणि शिक्षक वृंद याच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version