मढाळी बु.येथे विद्यार्थी सुरक्षा जनजागृती

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील प्राथ.शाळा मढाळी बु. येथे विद्यार्थी सुरक्षा जनजागृती व आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. कोलाड पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी खांब डीएचओ आम्रपाली भालेराव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा कोळी, उपाध्यक्षा पिंकी पवार, माजी अध्यक्ष विकास कोळी तसेच सर्व पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. यावेळी नितीन मोहिते यांनी विद्यार्थ्याना आजकाल घडत असलेल्या घटनेला सामोरे कसे जायचे, त्याअगोदर आपला स्वतचे संरक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करताना बालविवाह करू नये केल्यास कायद्यानुसार काय शिक्षा होते याची माहिती दिली. त्याच बरोबर दारूबंदी व इतर सर्व बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनतर विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे याबाबत आम्रपाली भालेराव यांनी मार्गदर्शन केले.आरोग्य तपासणी करून विविध आजारावरच्या औषध गोळ्याचे वाटप केले.

Exit mobile version