। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील खांदा वसाहतीतील सेक्टर-13 मधील फूटपाथ आणि रस्त्याची भयावह अवस्था झाली आहे. येथील रस्ते खोदले असून त्यातून निघालेल्या रेचग्याचे उंचच उंच डोंगर उभारून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या फूटपाथवरून जाताना शाळकरी मुलांना मोठी कसरकर करावी लागत आहे. त्यांना आपला तोल सांभाळत शाळेत जावे लागत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांना देखील जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. जर या ठिकाणी एखादा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? आम्ही वेळोवेळी टॅक्स भरत आहोत, तरीदेखील महानगरपालिका याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे, असे आरोप खांदा वसाहतीतील नागरिक बोलत आहेत.