सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांना आरटीओ अधिकाऱ्यांकडून सतर्कतेची जाणीव

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
११ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील मॅजिक पॉईंट जवळ विद्यार्थ्यांच्या सहलीवरून परतलेल्या बसला झालेल्या अपघातात ४१ विद्यार्थी जखमी तर दोन दुर्दैवी विद्यार्थ्यांना नाहक आपले प्राण गमवावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने महामार्गावरून सहलीसाठी निघालेल्या बसमधील विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा कसा प्रयत्न करावा याबद्दल प्रबोधन केले.

बस मध्ये प्रथमोपचार पेटी कुठे असते, प्रवास करताना हुल्लडबाजी न करता सीट वर बसून राहणेच योग्य असते अश्या जुजबी सूचना देऊन आपत्कालीन प्रसंगी कोणता मार्ग सुरक्षित बाहेर पडण्यासाठी योग्य असतो याबद्दल प्रात्यक्षिकासह प्रबोधन केले. त्यासोबत बसचालक आणि शिक्षक वर्गाला देखील योग्य मार्गदर्शन केले. 

एकंदरच अपघात होऊ नये यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे. विवेक भीमनवार – परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली  अभय देशपांडे – परिवहन उपायुक्त सदर अभियान सर्वच महामार्गावर राबवत आहेत.

Exit mobile version