प्लास्टिक बंदीसाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार

कागदावर चित्र काढून जनजागृती

| पाताळगंगा | वार्ताहर |

सध्या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढले असून, यापासून पर्यावरणांस धोका निर्माण होत चालला आहे. मात्र, यांचे गांभीर्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यांचा पाहावयास मिळत आहे. यांचाच फटका मुक्या प्राण्यांना बसत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव येथील विद्यार्थांनी प्लास्टिक बंदीसाठी हात पुढे सरसावत असून या माध्यमातून कागदावर याचे धोके, प्रदूषण हे चित्र काढून जनजागृती करण्यात आली.

आपल्या घरामध्ये भाजी, दुध, चॉकलेट, बीस्कीट, असे विविध प्रकारचे प्लास्टिक घरात असून आपण ते कचरा कुंडीत टाकत असतो. मात्र, तसे न करता आपण एका पाण्यांच्या बॉटलमध्ये टाकल्यांस या पिशव्या बाजुला करण्यांस स्वच्छता कर्मचारी यांस श्रम होणार नाही. तसेच यांचे विल्हेवाट लावण्यांस सोयीस्कर होईल याचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी करुन दाखविलेे. शाळकरी मुलांनी हा उपक्रम राबवून ग्रामस्थांच्यामध्ये एक उत्तम संदेश दिला आहे. यासाठी राजिप शाळा माजगांव मुख्याध्यापक किरण कवाद, भुषण पिंगळे, रेखा जाधव, शाळा व्यवस्थापन समिती यांनी सहकार्य केले.

Exit mobile version