• Login
Thursday, July 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

School Shopping: शाळेच्या घंटेसाठी सज्ज विद्यार्थी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 11, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
School Shopping: शाळेच्या घंटेसाठी सज्ज विद्यार्थी
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीची लगबग; 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सव्वा महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर सोमवार (दि. 15) पासून जिल्ह्यातील शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी विद्यार्थी उत्सुक झाले असून, शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने जिल्ह्यातील अलिबागसह प्रमुख बाजारपेठांमध्ये शालेय साहित्य खरेदीची लगबग वाढली आहे. पुस्तके, वह्या, दप्तर, कंपास, गणवेश आणि अन्य शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी दुकानदारांकडे पाहायला मिळत आहे.

एप्रिलअखेर परीक्षा संपल्यानंतर एक मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती. 14 जूनपर्यंतच्या या सुट्टीत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत मूळगावी जाणे, नातेवाईकांकडे मुक्काम करणे, क्रिकेट, गोट्या यांसारख्या पारंपरिक खेळांचा आनंद घेणे अशा विविध उपक्रमांत सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी सुट्टीचा कालावधी अभ्यास, शिकवणी वर्ग आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही वापरला.

आता नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरा दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीला सुरुवात झाली असून, सध्या खरेदीचा अंतिम टप्पा सुरू असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. जिल्ह्यातील अलिबागसह अन्य बाजारपेठांमध्ये पाठ्यपुस्तके, वह्या, दप्तर, गणवेश आणि अन्य साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा शालेय साहित्यांच्या किमतीत सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाल्याने पालकांच्या खिशाला कात्री बसत आहे. वाढती महागाई आणि शैक्षणिक साहित्यांच्या वाढलेल्या दरांमुळे शालेय खर्चाचे आर्थिक गणित अनेक कुटुंबांना नव्याने मांडावे लागत आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत यासाठी शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले आहे. बालभारतीकडे पाठविण्यात आलेल्या मागणीनुसार पाठ्यपुस्तके जिल्ह्यात दाखल झाली असून, ती तालुकास्तरावरून केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शाळा सुरू होण्यापूर्वी दोन दिवस शिक्षकांनी शाळांमध्ये उपस्थित राहून स्वच्छता, परिसर सुशोभीकरण आणि स्वागताची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विशेष उपक्रमही राबविले जाणार आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेत गावोगावी आणि घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधला आहे. जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. शाळांच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरात प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे स्वागत, प्रभातफेरी आणि पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवेशोत्सवाने होणार स्वागत
जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांना तोरणे लावली जाणार असून, परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात येईल. गावातून प्रभातफेरी काढून शिक्षणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. शाळांच्या पहिल्याच दिवशी जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम
जिल्ह्यातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सहा ते चौदा वयोगटातील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शिक्षकांसह सरपंच, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, युवक, बचतगट आणि ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून गृहभेटी घेऊन पालकांशी संवाद साधला जाणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
रायगड जिल्ह्यातील शाळांमधील तब्बल दोन लाख 256 विद्यार्थ्यांना शासनाकडून दहा लाख 89 हजार पाठ्यपुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यापैकी आठ लाख तीन हजार 63 पुस्तके जिल्ह्याला प्राप्त झाली असून, उर्वरित पुस्तकांचा पुरवठा सुरू आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ही पुस्तके वितरित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

Related

Tags: educationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadschoolschool fist daySchool Shoppingsocial media newssocial news
Previous Post

फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा

Next Post

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

रेवदंड्यात गांजा विक्रेत्यावर छापा

July 1, 2026
sliderhome

उद्या शाळांना सुट्टी

July 1, 2026
sliderhome

जुने कार्यकर्ते स्वगृही परतले; शेतकरी भवनमध्ये जल्लोषात स्वागत

July 1, 2026
sliderhome

अंबा नदीने ओलांडली इशारा पातळी

July 1, 2026
sliderhome

जयंत पाटील यांचा मंगळवारी अभीष्टचिंतन सोहळा

July 1, 2026
sliderhome

चार खून केलेत… पुढचा नंबर तुझा!; लोकलमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा

July 1, 2026
Next Post
उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

उरणच्या नगराध्यक्षांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?