विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी व्हावे- सुरेश लाड

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याचे नाव प्रतीक जुईकर यांनी थेट आयएएस उज्ज्वल केले आहे, तसे यश मिळविण्यासाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ती परंपरा कायम ठेवण्याची जिद्द बाळगावी, असे आवाहन कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी केले. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा कर्जत दहीवली येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. सुरेश लाड, पक्षाचे तालुका अध्यक्ष भगवान चंचे, उपाध्यक्ष अशोक भोपतराव, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस तानाजी चव्हाण, कर्जत नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते शरद लाड, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, रजनी गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष पुष्पा दगडे, युवक अध्यक्ष सागर शेळके, महिला तालुका अध्यक्ष रंजना धुळे, कर्जत शहर अध्यक्ष रणजित जैन, नगरसेवक पालकर, निलघे आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मागील दोन वर्षे कोरोना काळातील कठीण परिस्थिती विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम घेता येत नव्हता. मात्र, आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या गुरुवर्य यांनी आपल्या तालुक्याची उंची शैक्षणिक यशाच्या माध्यमातून मिळविलेले यश याचे कौतुक झाले पाहिजे, असे सांगितले.
तालुक्यातील 100टक्के गुण मिळविणार्‍या 22 शाळा यांचा सन्मान करण्यात आला.तर दहावी मधील 49 माध्यमिक शाळांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी आणि बारावी मधील 15 कनिष्ठ महाविद्यालय मधील प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. दहावी मध्ये तालुक्यात समीक्षा प्रतीक यादव ही कर्जत एज्युकेशन सोसायटी ची विद्यार्थीनी 96.80 टक्के गुण मिळवून पहिली आली आहे.

Exit mobile version