विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे

डॉ. सनाउल्लाह घरटकर यांचे प्रतिपादन

| आगरदांडा | प्रतिनिधी |

उच्च शिक्षणाने जीवनातील ध्येय, आकांक्षा आणि कर्तव्य मूल्यवर्धित व्हायला मदत होते, नव्हे शिक्षण हे ऑक्सिजनसारखे आहे. विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन या घटकांनी शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन उद्योजक तथा गल्फ लाईटस दोहा कत्तार समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सनाउल्लाह घरटकर यांनी केले. मुरुड अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये डॉ. सनाउल्लाह घरटकर फाऊंडेशनतर्फे आयोजित शिक्षण आणि विकास या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष वैश्विक भारतीय हसन अ. करीम चौगुले, डॉ. सनाउल्लाह घरटकर, माजी उपकुलगुरु प्रा. अख्त रुल वासे, अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉ. नदिम महिर, अंजुमन हिमायतुल डिग्री कॉलेज, महाडचे प्राचार्य डॉ. मुब्बशीर जमादार, कोंकण ए खतिबचे अध्यक्ष अलि शम्सी, घरटकर फाऊंडेशनचे अध्यक्ष राशीद फहीम, रायगड मुस्लीम वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष मुस्तफा पोंजेकर, मामिन पेट्रोलियमचे संचालक मसूद पेशीमाम, मुफ्ती रफिक पुरकर, मुरुड नगरपरिषद माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी उपनगराध्यक्ष अतिक खतीब, शाहिद कलाब, विनोद वाघ, डॉ. मकबुल कोकाटे, मराठी, उर्दु तसेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी संजीवनी आरोग्य केंद्र तसेच मुरुड नगर परिषद महोत्सव समितीतर्फे डॉ. घरटकर यांचा जाहीर सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद कलाब यांनी, तर आभार प्रदर्शन राशीद फहीम यांनी केले.

Exit mobile version