विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत

पनवेल वाहतूक शाखेचे आवाहन

| पनवेल | वार्ताहर |

विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी गुरुवारी केले. पनवेल वाहतूक शाखेतर्फे खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पनवेल वाहतूक शाखेमार्फत विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याबाबत तसेच हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, सिग्नल जम्पिंग न करणे याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक एस.के. पाटील, बी. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक, वाहतूक पोलिसांचे अधिकारी, युनायटेड वे या एमनजीओचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी छोटे-छोटे वाहतूक नियमांचे पालन केल्याने गंभीर अपघात टाळून आपला जीव कुटुंबावरील आघात टाळता येऊ शकतो याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

Exit mobile version