पी.एन.पी संकुलात अभ्यास दिवस साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग आणि मंडळाकडून 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘अभ्यास दिवस’ साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कला शाखा प्रमुख प्रा. नम्रता पाटील, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, प्रा. दिनेश पाटील, ग्रंथपाल कांचन म्हात्रे, प्रमुख प्रा. केतकी पाटील, मंडळ प्रमुख प्रा. योगिता पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मिलिंद घाडगे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे आणि सर्व मान्यवरांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. कांचन म्हात्रे यांनी सादर केले. महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षाली सानप, काजल पाटील, गौरी पुरोहीत, वेदांत कंटक या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शिक्षकांच्या मनोगता मध्ये प्रा. प्रीती पाटील, प्रा. दिनेश पाटील, प्रा, नम्रता पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या योगदानावर तसेच अभ्यास दिनावर महत्त्वपूर्ण विवेचन केले. आपल्या अध्यक्षीय वक्तव्यामध्ये महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आजच्या अभ्यास दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाचन आणि अभ्यास किती महत्त्वाचा आहे यावर चर्चात्मक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संजना पाटील यांनी केले.

Exit mobile version