चिखलप केंद्राचा अभ्यास दौरा

। म्हसळा । वार्ताहर ।

गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील चिखलप केंद्रातील सर्व शाळांतील शिक्षकांनी केंद्र प्रमुख किशोर मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत अगदी दुर्गम भागातील तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या रायगड जिल्हा परिषद गायरोणे शाळेला बुधवारी (दि.24) भेट दिली.

यावेळी मुख्याध्यापक सुनील साठे व स्मिता शिंदे यांनी परसबाग यामधील विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे यांची माहिती दिली. यानंतर विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेले विविध उपक्रम यामध्ये शाळापुर्व तयारी मेळावा, शाळा आणि वर्ग सजावट, शालेय रंगरंगोटी, वृक्षारोपण आणि जोपासना, तंबाखू मुक्त शाळा, परसबाग जिल्हा आणि तालुकास्तरीय बक्षीस, मेरी माटी मेरा देश, विद्यार्थी बचत बँक, नवोदय परीक्षा विद्यार्थी निवड, शिष्यवृत्ती धारक आणि पात्र विद्यार्थी घडविणारी दुर्गम शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, कब बुलबुल उपक्रम राबविणारी शाळा, क्रिडा स्पर्धा आयोजन आणि सहभाग, आरोग्य तपासणी, महावाचन चळवळ सहभाग, सहल आणि क्षेत्रभेट, तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी घडविणारी शाळा, आदर्श आणि गुणवंत शिक्षकवृंद बँक, बाल वाचनालय विविध स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी अध्यापन तसेच इतर उपक्रमांची माहिती दिली. तालुक्यातील एकदम दुर्गम समजल्या जाणार्‍या या शाळेतील विद्यार्थी अत्यंत गुणी व हुशार आहेत नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झाले असून मंथन स्पर्धा परीक्षामध्ये जिल्हा व विभाग स्तरावर क्रमांक पटकावला स्वच्छता टापटिपपणा, ग्रामस्थांचे सहकार्य व शिक्षकांचे योगदान यामुळे शाळा नावारूपाला आली असून चालू वर्षी शासनामार्फत राबविण्यात आलेल्या ममुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाफ उपक्रमांतर्गत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल सर्वांनी कौतुक केले.

Exit mobile version