। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुडच्या जंजिरा विद्या मंडळ संचलित सर एस.ए.हायस्कूल व स्व.म.ल.दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुभाष आग्रावकर आपल्या सेवेची 37 वर्षे 3 महिने सेवा करुन सेवानिवृत्त झाले.या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी जंजिरा विद्या मंडळाचे अध्यक्ष सुधाकर दांडेकर, प्रतिभा जोशी, चंद्रकांत अपराध, प्रमोद भायदे, पांडुरंग आरेकर, सुधीर विरकुड, सरोज राणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यावेळी उपस्थित होते.