शरीरसौष्ठव स्पर्धेत सुभाष पुजारी यांना ‘सुवर्ण’

| पनवेल | प्रतिनिधी |
दक्षिण कोरिया येथे संपन्न झालेल्या 14 व्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकला. 6 12 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्यांची भारतीय शरीरसौष्ठव फेडरेशनच्या वतीने भारतीय संघातून निवड करण्यात आली होती. त्यांनी आतापर्यंत 8 जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके पटकावली आहेत.

सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज सहा तास मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. या स्पर्धेसाठी 41 देशातील संघानी व 450 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेसाठी त्यांना चेतन पाठारे जागतिक शरीरसौष्ठवचे सचिव विक्रम रोठे, जागतिक शरीरसौष्ठवच्या कायदेविषयक सल्लागार रागिणी पुजारी, आनंद गुप्ता व विवेक गुप्ता संचालक गॅम्प्रो ड्रिलिंग कंपनी खालापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या या यशाबद्दल पोलिस महासंचालक रजनीश शेठ, डॉ.भूषणकुमार उपाध्याय, विवेक फणसाळकर पोलीस आयुक्त मुंबई हेमंत नगराळे, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक विनय करगावकर, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य निखिल गुप्ता, पोलीस सहआयुक्त प्रशासन मुंबई शहर एस जयकुमार , पोलीस सह आयुक्त (वाहतूक) प्रवीण कुमार पडवळ ,पोलिस महानिरिक्षक (प्रशासन ) निसार तांबोळी , पोलीस उपायुक्त वाहतूक राजू भुजबळ, पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी व त्यांचे सहकारी मित्र सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

Exit mobile version