पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश

नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्‍वास.

। तळा । वार्ताहर ।

तळा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून जानेवारी महिन्यात भटक्या कुत्र्यांनी जवळपास 18 जणांचा चावा घेतला होता. त्यातील एका कुत्र्याने जवळपास आठ ते दहा जणांचा चावा घेतला आहे. या कुत्र्याच्या दहशतीमुळे कित्येकांना आपला जीव मुठीत घेऊन बाजारपेठेत जावे लागत होते. या गोष्टीकडे गांभीर्याने घेत कोलाड येथील रेस्न्यू टीम सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड यांनी अवघ्या काही तासांत या चावा घेणार्‍या कुत्र्याला पकडले. यामुळे जीव मुठीत धरून असलेल्या तळा शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Exit mobile version