। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, सतत प्रयत्नशील राहिल्याने यश निश्चित मिळते असे डॉ.वनिता सूद मुख्य कल्याण अधिकारी कार्मिक मंत्रालय यांनी मुंबईमध्ये समाज सदन गृह कल्याण केंद्र, सेक्टर 07 अँटोप हिलच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
यावेळी अजित कुमार एसइ, के.के.गोयल कार्यकारी अभियंता, शशिकांत मोरे सहायक अभियंता सिव्हिल, शैलेंद्र कुमार सहायक अभियंता निर्वाचन, लक्ष्मण चव्हाण जेई इलेक्ट्रिकल आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवी मुंबईचे जे.एम.सिंह यांनी सांगितले की, डॉ.वनिता सूद यांच्या निरंतर प्रेरणेने आम्हाला गृह कल्याण केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना विविध प्रकारच्या योजना राबविण्यासाठी प्रेरणा मिळते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.बी.के.महाराणा, जी.के.के., आर.डब्लू.ए, पी.टी.ए.चे सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी योगदान दिले.