बोर्लीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश

ग्रामस्थांनी मानले सरपंचांचे आभार
जलवाहिनी चोकअप झाल्याने बंद होता पाणीपुरवठा
| कोर्लई | वार्ताहर |
फणसाड धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून मुरुड तालुक्यातील बोर्ली गावात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी चोकअप झाल्याने गेल्या चार दिवसांपासून बंद झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याने ग्रामस्थांनी सरपंच चेतन जावसेन यांचे आभार मानले.

फणसाड धरणाच्या मुख्य जलवाहिनीतून बोर्ली गावात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी चोकअप झाल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद झाला होता. ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन जावसेन यांनी यात लक्ष घालून अक्षरशः स्वतः खड्ड्यामध्ये उतरून जलवाहिनी दुरुस्तीचे काम केल्याने गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे.

स्वच्छ शुद्ध पाणी हा प्रत्येकाचा अधिकार असून, सुरळीतपणे पाणीपुरवठा करणे, ही सरपंचांचीदेखील तितकीच जबाबदारी आहे. गावाला तातडीने पाणीपुरवठा करण्यात कामात शेकापचे युवा नेते मनोहर भोपी यांचे सहकार्य लाभले. पुरोगामी विचारांनी प्रेरित कामे करत असताना तळागाळातील जनतेची कामे करणे, हेच ध्येय समोर ठेवून पुढील वाटचाल करीत असल्याची प्रतिक्रिया सरपंच चेतन जावसेन यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version