। नविन पनवेल । प्रतिनिधी ।
फडके विद्यालयातील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्याला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. राजीव हजरनीस, शिक्षण प्रबोधिनीचे सहायक संचालक केदार तापीकर, भारत विकास परिषदेचे कोकण प्रांत अध्यक्ष सुबोध भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रमेश चव्हाण यानी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादामुळेच यश मिळते. विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये जपावी. विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षकांच्या प्रयत्नांचे यश असते. यावेळी त्यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील अनुभव व स्वतःच्या शालेय जीवनातील प्रेरक प्रसंग सांगितले. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. त्यांनी संस्थेच्या समुपदेशन क्षेत्रात सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले.