| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे झालेल्या तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत आर्या रवींद्र लोखंडे (उंच उडी प्रथम ), कनिका नितीन कचरे (200 मीटर धावणे प्रथम), कनिका नितीन कचरे (400 मीटर धावणे प्रथम), हर्ष संदीप महाडिक (400 मीटर धावणे प्रथम), आदेश प्रदीप लाडगे (लांब उडी प्रथम), मधुरा गणेश कोस्तेकर (थाळी फेक द्वितीय), अक्षरा रवींद्र लोखंडे (1500 मीटर धावणे द्वितीय), साहिल सचिन गोळे (उंच उडी द्वितीय), शर्ती प्रकाश धनावडे (गोळाफेक तृतीय), आर्या महेश चितळकर (200 मीटर धावणे तृतीय), वैष्णवी दिपक खराडे (उंच उडी तृतीय), कनिका नितीन कचरे (लांब उडी तृतीय), कर्तव्य सुधीर लोखंडे (थाळीफेक तृतीय), विघ्नेश घनश्याम नाकटे (100 मीटर धावणे तृतीय), विघ्नेश घनश्याम नाकटे (200 मीटर धावणे तृतीय)हे विद्यार्थी विजयी ठरले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक-संस्थापक/अध्यक्ष रवींद्र लोखंडे, मुख्यध्यापक रिया लोखंडे, क्रीडा शिक्षक विनायक माहित यांचे सहकार्य लाभले.
ज्ञानांकुरच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेत यश
