अलिबाग मधील कराटे पटूंचे यश

20 जणांना सुवर्ण पदक; चौघांना रौप्य तर दोघांना कास्य पदक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जपान कराटे-डो इंडिया आयोजित दुसरी महाराष्ट्र राज्य शितोर्‍यू कराटे- डो ई-कटा चॅम्पियनशीमध्ये अलिबाग मधील कराटे पटूने यश मिळवित 20 जणांनी सुवर्णपदक पटकावले. चौघांनी रौप्य तर दोघांनी कास्य पदकावर आपले नाव कोरले. प्रमुख संघटक शिहान राहुल तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण 560 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील एकूण 26 विद्यार्थ्यांनी शिहान राहुल तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता. स्पर्धेत इंडिव्हिज्युअल कटा व टीम कटा असे दोन इव्हेंट होते.


यात श्रियांस तावडे, अद्वैत मात्रे, वरद यादव, सिद्धेश यादव, देवांक ढवळे, ओमकार बाबर, तनिष्क तावडे, आयुष अंबाडे, ईशान वैशंपायन, लव्या घाडगे, प्रिशा खरचे, चार्वी पाटील, समीक्षा पाटील, सायशा मुंबईकर, पूर्वा भोर, सायली शेळके, मानसी कंटक, विधी ठाकूर, मुमूक्षा घरत, भाविका जैन हे सुवर्ण पदक विजेते ठरले. तर रौप्य पदक अनय पाटील, आयुष पाटील, सृष्टी पाटील, राजनंदिनी खपाले यांनी पटकावले.सृजन लिंगायत आणि विरेंद्र पेडणेकर यांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांचे मेडल व प्रशस्तीपत्रांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस शैलेश चव्हाण, शेकापचे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, संभाजी ब्रिगेडचे निलेश पाटील, गणेश भगत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वरिल सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version