कुस्ती स्पर्धेत पीएनपी महाविद्यालयाचे यश

 | अलिबाग | प्रतिनिधी |

 प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. बाबासाहेब नाजरे हायस्कूल आवास येथे बुधवार 6  सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्पर्धेत पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अलिबाग तालुक्यात क्रिडा स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. 

१७ वर्षे वयोगटातील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये ४५ किलो वजनी गटात यश कृष्णा मेंगाळ याने प्रथम क्रमांक तर ४८ किलो वजनी गटात संचित संतोष गायकवाड याने प्रथम क्रमांक पटकावला १९ वर्षे वयोगटातील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात पारस प्रमोद पाटील याने प्रथम क्रमांक तर १९ वर्षे वयोगटातील ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात विनय केशव पाटील याने प्रथम क्रमांक आणि १३० किलो वजनी गटात वेदांत राजेश पाटील याने प्रथम क्रमांक पटकाविला. 

विजेत्या खेळाडूंचा संथेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील यांनी अभिनंदन केले तर या क्रिडा स्पर्धेसाठी क्रीडा प्रशिक्षक म्हणून तेजेश म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version