। म्हसळा । वार्ताहर ।
रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी व म्हसळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा म्हसळ्यातील इंग्रजी माध्यम शाळेत पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. या क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाखालील गटात षाष्टी येथील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळेतील विदयार्थ्यांनी सर्व सामने जिंकून तालुक्यात पहिला क्रमांक पटकवला आहे. या यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या क्रीडा स्पर्धेतील नेत्रदिपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, माध्यमिक शाळा पाष्टीचे अध्यक्ष राजाराम धुमाळ, मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी विजयी संघाचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच, पंचक्रोशीतील पदाधिकारी, पालक वर्ग व माजी विद्यार्थ्यांनी शाळेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हे यश मिळवण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक प्रफुल्ल पाटील, तसेच शाळेतील शिक्षक बिलाल शिकलगार, ललित पाटील, विनयकुमार सोनवणे, संदिप दिवेकर व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.