। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खोपोलीतील शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनता विद्यालय जिमखाना हॉल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत खोपोलीसह खालापूर तालुक्यातील वीसहून अधिक शाळेतील 150 कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबू जळगावकर, बांधकाम व अर्थ सभापती यशवंत साबळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, मुख्याध्यापक पीजी देशमुख, उपमुख्याध्यापक हेमंत खाडे, जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, मितेश शहा, संजय शिर्के, जयवंत माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय पंच सावळेराम पायमोडे, रोशनी परदेशी, दिवेश पलांडे, विनोद जाधव, ओंकार निंबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जेष्ठ क्रीडा शिक्षक राजाराम कुंभार, प्रार्थना भोपातराव, बुवा यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच, या स्पर्धेतील विजयी कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.